गोहत्या प्रकरणी लाटवण पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा शांततमय मार्गाने निषेध मोर्चा

लाटवण पंचक्रोशी ग्रामस्थांनी मंडणगड येते काढलेल्या मोर्चात सहभागी पंचक्रोशीतील ग्रामस्थ

मंडणगड | प्रतिनिधी : लाटवण पंचक्रोशीतील गोहत्या प्रकरणी लाटवण पंचक्रोशीतील शेकडो ग्रामस्थांनी 17 मे 2023 रोजी शांततामय मार्गाने मंडणगड तहसिल कार्यालयासमोर मोर्चा काढला व तहसिलदार विजय सुर्यवंशी यांची भेट घेऊन प्रशासनाने या विषया संदर्भात कडक कार्यवाही करण्याची मागणी केली. यामुळे तहसिलदरांनी या विषयासंदर्भात शक्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तहसिलदारांसमवेत झालेल्या सभेत समाजकंटाकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी सतंप्त ग्रामस्थांनी केली.

लाटवण पंचक्रोशी ग्रामस्थांनी मंडणगड येते काढलेल्या मोर्चात सहभागी पंचक्रोशीतील ग्रामस्थया विषयासंदर्भात मंडणगड तहसिल कार्यालयाकडे 17 मे 2023 रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनातील माहीतीनुसार 9 मे 2023 रोजी पहाटे पंचक्रोशीतील वलौते गावाच्या हद्दीजवळ सार्वजनीक स्थळी भारजा नदीचे पात्राजवळ काही अज्ञात समाज कंटकांनी अवैधरित्या उघड्यावर गोहत्येचे (गोवंश) कृत्य केले आहे. नदीचे पात्रात गोहत्या करुन अवशेष फेकून दिले आहेत. काही गाईंना भुलीचे इंजेक्शन देऊन समाज कंटक घटनास्थळावरुन पसार झालेले आहेत तरी अशा प्रकारचे कृत्य वारंवार होत आहेत. अशा कृत्यातले काही आरोपी या अगोदर अटक झालेले आहेत. पुराव्या अभावी ते सुटत आहेत का त्याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. लाटवण पंचक्रोशीतील सर्व धर्मीयांमध्ये सामाजीक सलोखा आहे. कायदा आणि सुव्यवस्था आबाधीत राखणे करिता अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या समाज कंठकांना कायद्याने योग्य जरब बसविणे गरजेचे आहे. त्याकरिता 17 मे 2023 रोजी शांततेच्या मार्गाने मोर्चा काढण्यात आला आहे.

या मोर्चाने तालुक्याचे लक्ष वेधून घेतले. लाटवण पंचक्रोशीतील शेकडो ग्रामस्थ तहसिल कार्यालयसमोर एकवटले व तहसिलदार विजय सुर्यवंशी यांची भेट घेऊन शिष्टमंडळाने निवेदन सादर करीत कारवाई करावी या आशयाचे निवेदन सादर केले निवेदनावर समाज सेवक गंगाराम कदम, राजेंद्र सोंडकर, रणजीत कासारे, दिपक हेंद्रे, राजेंद्र गायकवाड, अशोक गायकवाड, जितेंद्र भागणे, आत्माराम सुतार, पांडुरंग माने, संतोष राणे , प्रदिप कासुर्डे, गणेश सुतार यांच्या सह्या आहेत. यावेळी संतोष गोवळे, नितीन म्हामुणकर, चेतन सातोपे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.