खेड (प्रतिनिधी)
तालुक्यातील किंजळे तर्फे नातू येथे १७ ते २५ फेब्रुवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह व जगद्गुरू संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त काकड आरती, संत तुकाराम महाराज गाथा पठण, महाप्रसाद, प्रवचन, हरिपाठ, हरिकीर्तन, जागर यांच्यासह विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच २४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता दीपोत्सव व एकादशी निमित्त ज्ञानेश्वरी ९व्या व १२व्या अध्यायाचे सामुदायिक पारायण होईल.









