खेड(प्रतिनिधी)
ज्या वयात शिक्षण घ्यायचे, खेळायचे, त्या वयात काही मुलांना घरची जबाबदारी पेलण्यासाठी अंगमेहनतीचे काम करावे लागत आहे, अशी दुर्दैवी स्थिती लोटे औद्योगिक वसाहतीत दिसत आहे. आमचा फोटो घेऊ नका, आम्हाला कामाची गरज आहे, असेही या मुलांनी’ सांगितले.
लोटे परशुराम औद्योगिक वसाहत ही पूर्णपणे रासायनिक कारखानदारी म्हणून ओळखली जाते. अनेक छोट्या मोठ्या कंपन्यांमध्ये ठेकेदारी तत्वावर काम करण्यासाठी, अंगमेहनत वा जोखमीचे काम करण्यासाठी राज्याबाहेरील मजुरांची आयात केली जाते. या प्राधान्याने बिहार, झारखंड, बंगाल व उत्तरप्रदेश येथील मजुरांचा समावेश आहे. इथल्या कारखान्यांनतून बारा तासाच्या दोन पाळीत काम करण्यासाठी अशा कामगारांचा उपयोग केला जात आहे
एका कंपनीत केवळ बारा तेरा चौदा वर्षाचे बालमजूर काम करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत कंपनीत याची विचारणा करू नका, अशी विनंती खुद्द या बालकामगारांनीच केली आहे. १२ -१२ तासाच्या दोन पाळीत काम करण्यासाठी कामगारांचा उपयोग केला जातो. केवळ अंगमेहनतच नव्हे तर उत्पादन प्रक्रियेतही असे मजूर काम करीत असतात.
त्यांचा . ठेकेदारही परप्रांतीय असून तो त्या कंपनीचाच संबंधित अधिकारी असल्याचे समजते. ‘आमचे छायाचित्र घेऊ नका, किंवा कंपनीत याबाबत विचारणा करू नका’ अशी विनवणी त्यांनी केली.
तपासणी होते का?
कंपनीत बालमजुर काम करत असल्याचे निदर्शनात आले आहे. कामगार आयुक्त कंपन्यांना भेट देतात का? देत असतील तर या बाबी त्यांनी नजरेआड केल्यात का ? कामगार नियुक्ती करताना कामगारांच्या वयाचा पुरावा सोबत जोडलेला असतो का? की काहींना वाढीव वय दाखवून कामावर रुजू केले जाते का ? त्यांचा भविष्य निर्वाह निधी वा तत्सम सुविधा दिल्या जातात का, असे अनेक प्रश्न आता उभे राहिले आहेत.










