पूर्णिमा मोरजकर यांना प्र. शी. नेरुरकर स्मृती साहित्य पुरस्कार प्रदान 

नट वाचनालयाचे आयोजन

बांदा l प्रतिनिधी :   बांदा नट वाचनालय या संस्थेचा (कै.) प्र. श्री. नेरूरकर स्मृती साहित्य पुरस्कार रोणापाल येथील मालवणी साहित्यिका सौ. पूर्णिमा गावडे-मोरजकर यांना प्रदान करण्यात आला. वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत यांच्या हस्ते नेरूरकर यांच्या जयंती कार्यक्रमात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

 

वाचनालयाच्या नाडकर्णी मभागृहात झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर सत्कारमूर्ती पूर्णिमा गावडे-मोरजकर, सचिव राकेश केसरकर, उपाध्यक्ष निलेश मोरजकर, सदस्य प्रकाश पाणदरे, सौ. स्वनिता सावंत, ज्येष्ठ मार्गदर्शक अंकुश माजगावकर, शंकर नार्वेकर, जयंत पिंगुळकर, सौ. शुभांगी पिंगुळकर, संतोष वालावलकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी कै. नेरुरकर यांच्याविषयी प्रकाश पाणदरे, शंकर नार्वेकर, संतोष वालावलकर यांनी मनोगत व्यक्त केले.  सहसचिव हेमंत मोर्ये यांनी मानपत्राचे वाचन केले.

सौ. पूर्णिमा मोरजकर यांनी आपल्या मालवणी साहित्यकृती ‘गजाल गाथण’ व एकूण मालवणी साहित्याविषयी माहिती दिली. माझ्या जीवनातील पहिलाच पुरस्कार असून ज्याठिकाणी माझे बालपण व शालेय शिक्षण झाले त्याठिकाणी माझा झालेला सन्मान विशेष असल्याचे सांगितले. रोणापालचे माजी सरपंच सुरेश गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी आपला गजाल गाथण हा कथासंग्रह वाचनालयाला भेट दिला.

 

यावेळी वाचनालयाचे संचालक जगन्नाथ सातोसकर, सुधीर साटेलकर, रोणापालचे माजी सरपंच प्रकाश गावडे, उदय देऊलकर, प्रवीण परब, कास सरपंच प्रवीण पंडित, राकेश परब, अजित दळवी, उदय गावडे, प्रफुल्ला गावडे, प्रिया केतकर, ग्रंथपाल सुस्मिता नाईक तसेच वाचक व वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राकेश केसरकर यांनी केले.

———-