वैभववाडीत आज सावरकर विचारदर्शन सभा 

प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे करणार मार्गदर्शन

पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती 

वैभववाडी l प्रतिनिधी :       वैभववाडी येथे स्वातंत्र्यवीर सावरकर विचारदर्शन सभेचे आयोजन आज सायंकाळी 6 वाजता करण्यात आले आहे. याप्रसंगी राज्याचे मत्स्योद्योग मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, तसेच मालवण, कुडाळ विधानसभेचे आमदार नितेश राणे उपस्थित राहणार आहेत.. या विचारदर्शन सभेला प्रसिद्ध अभिनेते व्याख्याते शरद पोंक्षे मार्गदर्शन करणार आहेत.

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व या संकल्पनेतून सकल हिंदू समाजाला एकत्रित करण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्योजक सोहम काटे यांच्या वतीने या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा वैभववाडी येथील दुर्गामाता मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे. तरी या सभेला तालुक्यातील सर्व सकल हिंदू बांधव व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सोहम काटे यांनी केले आहे.