मद्य वाहनासह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

एक्साईज कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाची कारवाई

प्रतिनिधी/ रोहन कांबळे lकोल्हापूर: राज्य उत्पादन शुल्क एक्ससाइज कोल्हापूर जिल्हा अधीक्षक श्रीमती स्नेहलता नरवणे, उपाधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरारी पथकाने संभाजीनगर पेट्रोल पंपासमोरील चौकामधून पांढऱ्या रंगाची फोक्सवॅगन पोलो वाहन थांबवून तपासणी केली असता गाडीतील पाठीमागील सीटवर व डिक्की मध्ये ठेवलेली गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याने भरलेली विविध ब्रँडचे बॉक्स मिळून आले.या प्रकरणी गणेश चन्नाप्पा कलगुटगी (व.व.२४) रा.रेसकोर्स नाका, संभाजीनगर बी १८४९ कोल्हापूर यास अटक करण्यात आली असून पकडण्यात आलेल्या पांढऱ्या रंगाची फोक्सवॅगन पोलो वाहन क्र.एम.एच ०५ बी.एल ७८५ मध्ये विविध ब्रँडचे मद्य मिळून आले. वाहनासह एकूण मुद्देमालाची किंमत सहा लाख १९ हजार ९४० असून मद्याची किंमत एक लाख १९,९४०असून याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून इतर आरोंपिचा शोध घेण्यात येत असल्याचे कोल्हापूर भरारी पथक क्र.१ चे निरीक्षक सदानंद मस्करे यांनी सांगितले. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक गिरीशकुमार करचे, अभयकुमार साबळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक कांचन सरगर, जवान विलास पवार, धीरज पांढरे, विशाल भोई, सचिन लोंढे, प्रसाद माळी व साजिद मुल्ला यांनी सहभाग घेतला.आरोपीला कोर्टात हजर केले असता तीन दिवसाची एक्साईज कोठडी मिळाली.