पालकमंत्री नितेश राणे यांचे ग्रामस्थांनी मानले आभार
मालवण | प्रतिनिधी : ग्रामविकास मंत्रालय पंचवीस पंधरा योजना 10 लाख निधीतून तळगाव येथे प्रथमच सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे तळगावातील दारवळवाडी, खांदवाडी व देऊळवाडी तसेच रामेश्वर/रवळनाथ मंदिर परिसरात स्ट्रीट लाईटला ऑन ग्रीड सोलर सिस्टीम बसविण्यात आली आहे. या प्रकल्पात दरदिवशी २८ ते ३० युनिट वीज तयार होत असल्याने ग्रामपंचायतीला येणारे वीज देयक अत्यल्प होणार आहे.
तळगावमधील दारवळवाडीचे सुपुत्र गोपाळ रघुनाथ दळवी यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून व दत्तात्रय रघुनाथ सावंत यांच्या पाठपुराव्याने तसेच, आमदार व विद्यमान मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री नितेश राणे यांच्या शिफारशीने सदरहू प्रकल्पास निधी प्राप्त झाला. खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्ह्यात गतिमान विकास होत असताना तळगावातही विकासाची गंगा येईल. असे सांगत ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले








