तिघांवर गुन्हा वाहनेही जप्त
खेड | प्रतिनिधी : खेड तालुक्यातील खोपी फाटा येथील रघुविर घाट फाटा नजीक ३१ हजार रुपये किंमतीचा २-किलो गांजा हा अमली पदार्थ विक्री साठी नेत असताना येथिल पोलिसांनी सापळा लावून रंगेहाथ पकडण्यात आले ही कारवाई १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ १५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
लक्ष्मण कुदंन भोरे (वय ४० मुळ रा. माझगावकर माळ झोपडपट्टी ता.जि. सातारा सध्या रा. आझाद चौक, लक्ष्मी नगर ता. कोरेगाव जि. सातारा), उज्वला बाळकृष्ण मेकले (वय-३६ वर्षे मुळ रा. माझगावकर माळ झोपडपट्टी ता. जि. सातारा सध्या रा. आकाश वाणी समोर ता. जि. सातारा), अविनाश हरीश्चंद्र मोरे (वय ४५ वर्षे रा. उचाट ता. महाबळेश्वर जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघां ची नावे आहेत.
गांजा हा अंमली पदार्थसह पांढ-या रंगाची महींद्रा कंपनीची स्कॉप्रियो मॉडेलची गाडी ०१,२५,०००/- रु कि. ची एक निळया काळया रंगाची यामाहा कंपनीची मॉडेलची स्कुटी ३१,१९७/- रु कि.चा एका निळया रंगाच्या प्लास्टिक पिशवी मध्ये असलेला हिरवट पाने, फुले, काड्या व बिया असलेला उग्र दर्प / वास असलेला एकुण २ किलो ०८४ ग्रॅम वजनाचा सुकलेला गांजा हा अंमली पदार्थ असा मुद्दे माल जप्त करण्यात आला.










