गावखडी/वार्ताहर :पावस एज्युकेशन सोसायटीच्या प्राचार्य श्रीमती साजिदा हनीफ दसुरकर यांना रॉयल एज्युकेशन सोशल वेल्फेअर पनवेल यांच्याकडून जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला पुरस्काराचे उद्देश झुलेखा दाऊद काझी हायस्कूल व मुराद उमर मुकादम ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स व कॉमर्स व राबिया शेख अहमद नाखवा जुनियर कॉलेज ऑफ सायन्स या विभागाचे विकासाच्या दृष्टीने मॅडमना पुरस्कार पदी निवड करण्यात आले प्रायमरी पासून जुनियर कॉलेज पर्यंतचे विद्यार्थी शिस्त व प्रशाला व कॉलेजचा दरवर्षी शंभर टक्के निकाल इतर विभागखेल हँडबॉल बास्केटबॉल विभागीय स्तरावर पोहोचले आहेत व तसेच विज्ञान प्रदर्शन स्काऊट गाईड वकृत्व स्पर्धा मध्ये विद्यार्थी राज्यस्तरापर्यंत पोहोचले आहेत हे करत असताना शाळेला सायन्स लॅब अटल लॅब मिलून विद्यार्थ्यांची खरी विज्ञानाची जाणीव करून देण्यात येत आहे संस्थेच्या उपाध्यक्ष श्री लाईक फोटो यांनी प्रशालेच्या साजिदा मॅडमचे शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी संस्थेचे जॉईन सेक्रेटरी मन्सूर काजी यांनी भाषण केले सदरील समारंभाला संस्थेचे सर्व पदाधिकारी शफिशेट काजी मुदस्सर मुकादम अक्रम नाकवा सलीम काझी रौफ सावकार आणि हनीफ मुल्ला व इतर सर्व पदाधिकारी प्रशालीचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते
फोटो मॅटर पावस एज्युकेशन सोसायटीच्या प्राचार्य श्रीमती साजिदा हनीफ दसुरकर यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करताना संस्थेचे उपाध्यक्ष श्री. लाईक फोडू,श्री.मन्सूर काजी,श्री.शफी काजी ,श्री.मुदसर मुकादम, अजमल मुल्ला,रिजवान नाखवा
फोटो दिनेश पेटकर गावखडी











