चिपळूण-संगमेश्वर तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

खा. सुनील तटकरे, आ. शेखर निकम यांनी प्रवेशकर्त्यांचे केले स्वागत

ठाकरे शिवसेनेला गळती

 

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण- संगमेश्वर तालुक्यात ठाकरे शिवसेनेतील गळती थांबताना दिसत नसून शुक्रवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा कार्यकारीणी बैठकीत दोन्ही तालुक्यातील तब्बल आठ सरपंच, पदाधिकारी, कार्यकर्त्यानी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आमदार शेखर निकम यांच्या कार्यपध्दतीवर विश्वास ठेवत पक्षप्रवेश केला असल्याचे प्रवेशकर्त्यानी सांगितले.

 

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने काही दिवसांपूर्वी ठाकरे शिवसेनेला धक्का दिल्यानंतर पाठोपाठ शुक्रवारी आमदार शेखर निकम यांनीही मोठा धक्का दिला आहे. सावर्डेतील जिल्हा कार्यकारणीया बैठकीत असुर्डे सरपंच पंकज साळवी, आंबतखोल सरपंच आत्माराम बांबाडे, आंगवली सरपंच अरुणा अणेराव, आरवली सरपंच निलेश भुवड, मावळंगे सरपंच प्रकाश वीर, आंगवली माजी सरपंच संतोष अणेराव, रावळगाव सरपंच नवनाथ जाधव, आबव पोंक्षे माजी सरपंच व शाखा प्रमुख दिपक शिगवण, सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी किसन केसरकर, जगदीश कांबळे, जयपाल कांबळे, आशिष कांबळे, कोकरे युवा सेना विभाग प्रमुख वैभव नरोटे, युवा सेना उपविभाग प्रमुख महेंद्र खापरे, बोंड्ये सामाजिक कार्यकर्ते बंडू चव्हाण, शांताराम काळे, अनंत पाचाळ, संतोष पांचाळ, दिपक धावडे व सहकारी, विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन मारुती लाड, अक्षय सुर्वे, राज शिंदे, गोविंद शिंदे, सुनिल चव्हाण, रमेश गावडे, गणेश खांबे, अस्मिता जाधव, स्मिता चव्हाण, सुवर्णा चव्हाण आणि सहकारी, असुर्डे उपशाखा अधिकारी परेश रेमजे, प्रसाद साळवी, रविंद्र गुरव, सुदेश खापरे, सुनिल साळवी, प्रमेय लांजेकर, महेंद्र पाष्ट्ये, विजय सावंत, विजय कदम, विशाल चव्हाण, करंबेळे तर्फे देवळे गोताडवाडी दिलीप गोताड, महादेव गोताड, शांताराम गोताड, दिपक रेवाळे, वंदना गोताड, महेंद्र रेवाळे, अंजली गोताड, नम्रता गोताड, विशाखा गोताड, वाझोंळे गावकर गुरुनाथ शिगवण, दिपक सनगळे, गणपत मोरे, संजय गाडगे, योगेश सनगले, चिपळूण शहरातील मयुर भोजने, बाळ तटकरे, अविनाश तटकरे, भाऊ सावंत, रोहीत खेडेकर आदीनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

 

दरम्यान खेड, मंडणगड, दापोली तालूक्यातील राष्ट्रवादो माजी जिल्हाध्यक्ष सुनिल खाडे, माजी सरपंच रामकृष्ण पाटील, कोळी समाज अध्यक्ष वाल्मिकी नगर भालचंद्र पाटील, माजी सरपंच वाल्मिकी नगर किशोर जोशी, माजी ग्रामपंचायत सदस्य सोटेकर, राजेंद्र पड्याळ आदीनीही प्रवेश केला.

 

आगामी जिल्हा परिषद, पांयत समिती, नगरपरिषद निवडणूकांया पार्श्वभुमीवर सावर्डेतील बैठकीत झालेला जंबो पक्षप्रवेश पक्षाला बळकटी देणारा ठरणार आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. तर पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी नव्या, जुन्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन पुढील वाटचाल करू, सर्वांना सन्मान देऊ अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे व आ. शेखर निकम यांनी दिली.