Locals as well as tourists are suffering at Ganapatipule




रत्नागिरी । प्रतिनिधी : मे महिन्याची धामधूम सुरु असून रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. मात्र या पर्यटकांसोबतच स्थानिकांना ट्राफिक जामच मोठा मनःस्ताप सहन करावा लागतो आहे.
गणपतीपुळे हे आता आंतरराष्ट्रीय धार्मिक आणि पर्यटन स्थळ झाले आहे. त्यामुळे प्रत्येक सुट्टीमध्ये या ठिकाणी पाच लाखांपेक्षाही अधिक पर्यटकांची गर्दी दिसून येते. यंदाही उन्हाळा तीव्र झाला तरीही गणपतीपुळे येथील स्वयंभू श्री गणेशाचे दर्शन आणि शेजारीच असलेल्या समुद्र सहलीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक रत्नागिरीत दाखल झाल्या आहेत . मात्र या पर्यटनासह स्थानिकांना मोठ्या गोंधळाचा सामना करावा लागत आहे.
गणपतीपुळेमध्ये प्रचंड गोंधळाची स्थिती आहे. पर्यटकांच्या खूप गाड्या येथे दाखल झाल्या असून अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक नियोजनाचा फज्जा उडाला आहे. त्यातच वाहतूक नियमाला पोलीस संख्येने कमी असल्याने ट्राफिक जाम झाल्याचे पाहायला मिळत आहे.












