मनापासून मालवण लॉयर्स बार असोसिएशन यांचे अभिनंदन : आमदार निलेश राणे 

देशाच्या विरोधात घोषणा देणाऱ्या परप्रांतीय मुस्लिम आरोपींचे वकीलपत्र घेतले नाही 

देशभरात हे उदाहरण गाजले पाहिजे : आ. निलेश राणे यांनी व्यक्त केल्या भावना 

मालवण | प्रतिनिधी : भारताच्या विरोधात घोषणा देत समाजात धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी मालवण शहरात आडवण येथे वास्तव्यास असणाऱ्या मुस्लिम परप्रांतीय भंगार व्यावसायिकासह महिला व एका अल्पवयीन मुलाविरोधात मालवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार सचिन वराडकर यांनी पोलिसांत दिली.

 

देशाच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यांच्या या कृत्यामुळे समाजात धार्मिक तेढ निर्माण झाली. या संतप्त हिंदू बांधवांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी विविध कलमान्वये आडवण येथे भंगार व्यवसायाच्या निमित्ताने राहणारे किताबुल्ला हमीदउल्ला खान, आयेशा किताबुल्ला खान यांच्यासह अन्य एका अल्पवयीन मुला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

आडवण येथील भंगार व्यावसायिक किताबुल्ला हमीदउल्ला खान, आयेशा किताबुल्ला खान या दोघांना अटक करून मालवण पोलिसांनी न्यायलायत हजर केले. मात्र त्यांचे वकीलपत्र कोणीही घेतले नसल्याने दोघांही संशयित आरोपीना सावंतवाडी कारागृहात नेण्यात आले. मंगळवारी पुन्हा त्या दोघांना मालवण न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.

 

मनापासून मालवण लॉयर्स बार असोसिएशन यांचे अभिनंदन : आ. निलेश राणे

 

आमदार निलेश राणे म्हणाले, मी मनापासून मालवण लॉयर्स बार असोसिएशन यांचे अभिनंदन करतो. मालवण मधील वकीलांनी भारताच्या विरोधात घोषणा देणाऱ्या आरोपी परप्रांतीय मुस्लिम यांचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय घेतला. देशभरात हे उदाहरण गाजले पाहिजे. मनापासून आभार. असे आमदार निलेश राणे यांनी म्हटले आहे.