न्हावेली (प्रतिनिधी): श्रेयस गावडे.
कोकणच्या मातीतील साहसी खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलगाडा शर्यतीचा मोठा उत्सव २६ एप्रिल रोजी न्हावेलीत होत आहे.
बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्रातील, विशेषतः ग्रामीण भागातील एक अत्यंत लोकप्रिय आणि पारंपारिक क्रीडा प्रकार आहे. ही परंपरा सुमारे चारशे वर्ष पूर्वीची असल्याचे मानले जाते. ही परंपरा राकत मागील तीन वर्षांपासून श्री. आनंद नाईक मित्रमंडळ, न्हावेली यांच्या वतीने भव्य राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात येते . या वर्षीचा ‘पर्व ३ रे’ अंतर्गत होणारा हा थरार रविवार, २६ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १ वाजल्यापासून न्हावेली येथील कुंभारभाट मैदान (चाळणी) येथे पाहायला मिळणार आहे.
बक्षिसांचा पाऊस:
या स्पर्धेत विविध गटांसाठी भरघोस रोख बक्षिसे आणि आकर्षक ढाली देण्यात येणार आहेत:
राज्यस्तरीय गट: प्रथम पारितोषिक २२,२२२ रुपये असून, एकूण १० क्रमांकांपर्यंत बक्षिसे दिली जातील.
जिल्हास्तरीय गट: प्रथम पारितोषिक १२,००० रुपयांचे आहे.
तालुकास्तरीय गट: प्रथम ७,००० रुपये आणि ६ क्रमांकांपर्यंत बक्षिसे.
गावटी गट: प्रथम ७,००० रुपये आणि ५ क्रमांकांपर्यंत बक्षिसे.
महत्त्वाचे नियम:
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या बैलांचे ‘लंपी’ लसीकरण प्रमाणपत्र आणि मालकाचा कलर फोटो तसेच आधार कार्डची झेरॉक्स अनिवार्य आहे. नाव नोंदणी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होईल आणि दुपारी १२ वाजता बंद होईल. विशेष म्हणजे ही स्पर्धा विना फटाका शासनाने ठरवून दिलेल्या अटी व शर्तींनुसार पार पडणार आहे.
नाव नोंदणीसाठी संपर्क:
सहभागासाठी इच्छुक मालकांनी आनंद नाईक (9420205241) किंवा बंटी नाईक (9422908025) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या निमित्ताने न्हावेली परिसरात बैलगाडा प्रेमींची मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.












