युवा शक्ती जागर यात्रा

भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज धनंजय महाडिक सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

26 एप्रिल रोजी किल्ले सिंधुदुर्ग, राजकोट, रॉक गार्डन येथे कार्यक्रम

भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राकेश सावंत, भाजप युवा मोर्चा मालवण शहर अध्यक्ष ललित चव्हाण यांची माहिती

मालवण | प्रतिनिधी : भाजप युवा मोर्चा महाराष्ट्राचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष कृष्णराज धनंजय महाडिक 25 व 26 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. 26 एप्रिल रोजी दुपारी 3.30 वाजता मालवण मधील किल्ले सिंधुदुर्ग शिव राजेश्वर मंदिरास भेट देणार आहेत. यावेळी भाजप मालवण सिंधुदुर्ग पदाधिकारी तसेच सिंधुदुर्गातील युवा वर्गाने स्वागतासाठी व कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन मालवण शहर युवा मोर्चा अध्यक्ष ललित चव्हाण यांनी केले आहे.

 

मालवण भाजप कार्यालयात ललित चव्हाण यांनी माहिती दिली. यावेळी नगरसेवक मंदार केणी, भाजप शहर सरचिटणीस पंकज सादये, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राकेश सावंत, युवा पदाधिकारी कुणाल खानोलकर, फ्रान्सिस फर्नांडिस उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना ललित चव्हाण म्हणले, भाजप युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष कृष्णराज धनंजय महाडिक यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा 25 ते 26 एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. 26 एप्रिल रोजी मालवण येथे आगमन होणार आहे. या निमित्ताने “युवा शक्ती जागर यात्रा” कार्यक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले आहे. या कार्यक्रमा निमित्त सर्व युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना व युवा वर्गाला भेट देणार आहेत.

 

26 एप्रिल रोजी दुपारी 3.30 वाजता मालवण येथे आगमन होणार आहे. यावेळी किल्ले सिंधुदुर्गला भेट देऊन किल्ले सिंधुदुर्ग वरील छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर राजकोट किल्ला येथील भव्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर रॉक गार्डन येथे जिल्ह्यातील सोशल मीडिया एम्प्लॉएनसर यांचा कॉफी विथ इनफ्लूयन्सर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या कार्यक्रमाला सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते, मालवण तसेच सिंधुदुर्गातील युवा वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण यांनी केले आहे.