रत्नागिरी : श्रीदेव भैरी जोगेश्वरी नवलाई पावणाई तृणबिंदूकेश्वर ट्रस्टच्या वतीने श्री देव भैरी मंदिरात महाशिवरात्र उत्सव आयोजित करण्यात आला आहे.
त्यामध्ये बुधवार दि. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ७.३० वा. श्रीदेव तृणबिंदुकेश्वर वर लघुरुद्र, सकाळी ८.०० वा. श्रीदेव भैरीवर अभिषेक , भजन व किर्तन होणार आहे.
तर सकाळी १० ते १२ श्री कालभैरव प्रासादिक भजन मंडळ, मुरुगवाडा, रत्नागिरी, युवा- श्री. दिपक पिलणकर, दु. १२ ते २ श्री दत्तप्रासादिक भजन मंडळ, भांडूप, मुंबई बुवा श्री. भगवान लोकरे
दु. ०२ ते ०३.३०- श्री दुर्गामाता महिला भजन मंडळ, कर्ला, रत्नागिरी बुवा- सौ. सिमा शेट्ये व श्रीमती संगिता सांवत
सायंकाळी ०३.३० ते ०४.३० किर्तन किर्तनकार, ह.भ.प. श्री. प्रविण मुळये, रत्नागिरी
सायंकाळी ०५.२० ते ०५.२० श्री सिध्दीविनायक भजन मंडळ, खालची आळी, रत्नागिरी. बुवा- सौ. शुभदा आगाशे
सायंकाळी ६ ते ८ श्री जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ, कोतवडे रत्नागिरी. बुवा-श्री. विजय मयेकर
रात्रो. ८ ते १० जय भैरव प्रासादिक भजन मंडळ, मुरुगवाडा, रत्नागिरी. बुवा श्री. अजय पिलणकर
रात्रो. १० ते १२ श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ, घुडेवठार, रत्नागिरी, बुवा श्री. सुदेश नागवेकर
रात्रो १२ ते १.३० वाजता, भोवत्या होणार असून
सकाळी ११ ते सांयकाळपर्यंत खिचडी प्रसाद असेल असे अध्यक्ष, श्रीदेव भैरी, जोगेश्वरी, नवलाई-पावनाई, तृणबिदूकेश्वर ट्रस्ट, झाडगाव, रत्नागिरी यांनी कळवले आहे.









