शिवरात्रीनिमित्त आरवली सोनसुरे येथे ‘शिवा’चे वाळूशिल्प ठरत आहे लक्षवेधी..

वेंगुर्ले l दाजी नाईक :आरवली सोनसुरे येथील प्रसिद्ध वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी शिवरात्रीनिमित्त आज आरवली सोनसुरे येथे साकारलेले ‘शिवा’चे वाळूशिल्प लक्षवेधी ठरत आहे.

उत्सव असो किंवा राष्ट्रपुरुषांची जयंती असो रविराज चिपकर आपल्या वाळू शिल्पाच्या माध्यमातून वाळूशिल्प साकारून कले द्वारे आपले प्रेम व्यक्त करत असतात. आज शिवरात्री असल्याने सर्वत्र मोठ्या उत्साहात हाऊ उत्सव साजरा होत आहे. त्यात आपली कला दाखवून चिपकर यांनी पूजा मांडली आहे.