श्री वडिलदेव खंडोबा जागृत देवस्थान गावडेवाडी येथे आज महाशिवरात्री उत्सव

शृंगारतळी (वार्ताहर ) सालाबादप्रमाणे याहीवर्षी गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे गावडेवाडी येथील श्री वडिलदेव खंडोबा जागृत देवस्थान ( गंगाराम मैदान) येथे आज बुधवार दि. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्री उत्सव व श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या महाशिवरात्री उत्सवानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा, महिलांचा हळदीकुंकू, आरती, सत्कार समारंभ तसेच रात्री मुलांचे डान्स असे कार्यक्रम होणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री शिवदेव बेलवृक्ष स्वाभिमानी मंडळ गावडेवाडीच्या वतीने करण्यात आले आहे.