माजी खासदार विनायक राऊत यांना अटक करा, देवगड पोलिसांकडे भाजपाने केली तक्रार दाखल

ना. नितेश राणे यांना भाषणामध्ये अपशब्द वापरला

माजी खासदार विनायक राऊत यांनी राजापूर येथे घेतलेल्या उबाठा सेनेच्या मेळाव्यामध्ये मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांना अपशब्द वापरला यामुळे भाजपा कार्यकर्ते संतप्त झाले असून आज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष व भाजपाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रकाश राणे यांनी देवगड पोलीस स्टेशनला माजी खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीत म्हटले आहे की विनायक राऊत यांनी राजापूर येथील सभेमध्ये ना.नितेश राणे यांना अपशब्द वापरला असून त्यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी तक्रारीत केली आहे यासंदर्भात राजकारण मराठी या युट्युब वर अपलोड असलेल्या व्हिडिओचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक धुमाळ यांची उद्या आपण भेट घेणार असल्याचे प्रकाश राणे यांनी सांगितले. यावेळी भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते गोविंद सावंत उपस्थित होते