खेड (प्रतिनिधी) खेड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कुळवंडी ही आदर्श ग्रामपंचायतींच्या यादीत स्थान मिळवत असून आहे. या ग्रामपंचायतीने प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ६८ घरकुलांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवून त्याचा सत्यपूर्ण पाठपुरावा केला. यातील ४५ घरकुले पूर्णत्वास नेण्यात ग्रामपंचायत यशस्वी ठरली. या उल्लेखनीय ची दखल घेऊन राज्य शासनाने ग्राम पंचायतिचा राज्यस्तरीय तृतीय क्रमांकाचा पुरस्कार कुळवंडी ग्रा प ला प्रदान करण्यात आला. हा सन्मान केंद्रीय व राज्य पातळीवरील मंत्रीमंडळाच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार वितरण सोहोळ्यात केंद्रीय ग्रामविकास मंत्री ना. शिवराजसिंह चौहान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री मा. ना. अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते. कुळवंडीचे सरपंच श्री. विष्णू
निकम, माजी सरपंच दिलीप निकम, ग्रामसेवक नितीन म्हापुसकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या यशाच्या निमित्ताने गावात मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली.
गावच्या प्रवेशद्वारापासून ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत विजय जल्लोष साजरा करण्यात आला, तसेच पारंपरिक फराळ वाटप करून व छोटेखानी सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेच्या अध्यक्षस्थानी दगडू निकम होते. सभेत उपसरपंच संचिता जाधव, ग्रामपंचायत सदस्य तेजस्विनी निकम, दिलीप डेरेवणकर, प्राजक्ता जंगम, तसेच विनोद शिळे, विजया निकम, अशोक निकम, संतोष खोपकर, सदानंद निकम, वनिता निकम आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचा समारोप करताना सरपंच विष्णू निकम यांनी सांगितले की, गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकोप्याने काम करत राहू, हे यश संपूर्ण गावाचे आहे. सर्व ग्रामस्थांनी ग्रामविकासाच्या नव्या वाटचालीसाठी निर्धार व्यक्त केला.












