बहीरवली फाटा येथे डस्टर कारची रिक्षाला धडक 

 

एका महिलेच्या पायाला गंभीर दुखापत

खेड(प्रतिनिधी)खेड तालुक्यातील बहीरवली फाटा येथील पुढील बाजूस एका डस्टर कारने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षामधील एका महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहेत. हा अपघात २३ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ११ : ३० वाजता झाला

 

 

. रिक्षा चालक संतोष वसंत गाय‌कवाड (४५) यांनी खेड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केल्यानुसार पोलीसांनी डस्टर कार चालक रविंद्र आनंदा भांदिगरे (२९) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी रिक्षा चालक संतोष गायकवाड हे आपल्या रिक्षाने भाडे घेवून गेलेल्या सहा महिलांना घेवून परत सुसेरी नं. २. . येथे दापोली-खेड मार्गाने बाजूने येत असताना खेड बाजूकडून भरधाव वेगात आलेल्या डस्टर कारवरील चालक रविंद्र भांदिगरे याने त्याची स्वत:ची बाजू सोडून फिर्यादी संतोष गायकवाड याच्या बाजूला नेऊन त्यांच्या रिक्षाला उजव्या बाजूस मधल्या सीटच्या दरवाजाला जोरदार धडक देवून अपघात केला. या अपघातात रिक्षामध्ये उजव्या बाजूस बसलेल्या एका महिलेस तिच्या उजव्या पायाला गंभीर दुखापती झाल्या आहेत, तसेच रिक्षा व डस्टर कारचे नुकसानही झाले आहे. म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.