खेड(प्रतिनिधी)
सीएसएमटीच्या फलाट क्र. १२, १३च्या विस्तारीकरणाच्या कामांमुळे मडगाव-सीएसएमटी तेजस एक्सप्रेससह मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेस २१ मार्चपर्यंत दादर स्थानकापर्यंतच धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले. यामुळे प्रवाशांना प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
मंगळूर-सीएसएमटी एक्सप्रेसचा २१ मार्चपर्यंत ठाणे स्थानकात तर मडगाव-सीएसएमटी तेजसचा प्रवास २१ मार्चपर्यंत दादर स्थानकात संपुष्टात येईल. मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेसचा प्रवासही २१ मार्चपर्यंत दादर स्थानकातच संपेल.








