रत्नागिरी : कोकण परिमंडळ रत्नागिरी येथे मुख्य अभियंता अनिल डोये यांच्या अध्यक्षतेखाली लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमास वैभव कुमार पाथोडे अधीक्षक अभियंता रत्नागिरी मंडल, सौ राजश्री मोरे अधीक्षक अभियंता (प्रभारी)पायाभूत आराखडा, नितीन पळसुले देसाई कार्यकारी अभियंता रत्नागिरी मंडल, दत्तात्रय नथुलाल साळी, कार्यकारी अभियंता रत्नागिरी विभाग तसेच सौ प्रणाली निमजे सहाय्यक महा व्यवस्थापक (मासं)(प्रभारी), राजेंद्र जाधव उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी (प्रभारी )हे सदर कार्यक्रमास उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे नियोजन परिमंडल कार्यालय व रत्नागिरी विभागीय कार्यालय यांचेकडून संयुक्तपणे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण झोरे, उपव्यवस्थापक (मासं) तर कार्यक्रमाची रूपरेषा पाटणकर अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांनी मांडली. सदर कार्यक्रमास रत्नागिरी विभागातील उपविभागीय अधिकारी व शाखा अभियंता तसेच जवळपास 80 जनमित्र कार्यक्रमास उपस्थित होते
यावेळी प्रथमच श्री वाघाटे प्रधान तंत्रज्ञ यांनी 35 वर्षाच्या आपल्या दीर्घ सेवेबद्दल मनोगत व्यक्त केले व जनमित्रांनी सुरक्षा संदर्भात व वसुली संदर्भात करावयाच्या कृती बाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमा वेळी सर्व उपस्थित जनमित्र यांना पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता करताना माननीय मुख्य अभियंता श्री डोळे साहेब यांनी सर्व जनमित्रांना सुरक्षितते संदर्भात योग्य ती काळजी घेण्याचे व महावितरण चे वसुलीचे उद्दिष्ट लक्षात घेऊन कोणत्याही मानसिक दडपणाखाली न येता उद्दिष्ट पूर्तीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.










