लांजा (प्रतिनिधी) शहरातील अग्रणी पतसंस्था असलेल्या जनता सहकारी नागरी पतसंस्था मर्या. लांजा या संस्थेला सलग सहाव्यांदा राज्यस्तरीय “दीपस्तंभ” पुरस्कार जाहीर झाला आहे. दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी गोकर्ण महाबळेश्वर कर्नाटक येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
एकूण ठेवी रुपये १० ते ५० कोटी पर्यंतच्या विभागांमध्ये कोकण विभागातून राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार जाहीर झाला असून गोकर्ण महाबळेश्वर, कर्नाटक या ठिकाणी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.मुबई यांनी पतसंस्थेला कळविले आहे .
सलग सहा वर्षे विविध ठेव विभागांमध्ये संस्थेला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे .पतसंस्थेच्या उल्लेखनीय कामाबद्दल दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या पुरस्काराच्या मानांकनासाठी संस्थेमार्फत आवश्यक असणारी प्रश्नावली फेडरेशनतर्फे मागविली जाते. महाराष्ट्रातील विविध सहकारी संस्थांमधून उत्कृष्ट काम करणार्या संस्थांची तज्ञ परीक्षण समिती मार्फत निवड केली जाते. यामध्ये पतसंस्थेला १० कोटी ते ५० कोटी ठेवी या गटातील , २०२५चा राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार जाहीर झाला आहे.
सहकारी बँकांच्या या आव्हानात्मक काळातही संस्थेने सभासदांना ठे्विदारांना व सर्व खातेदारांना आ्वश्यक ती सेवा पुरविली आहे. वेळप्रसंगी संस्थेने ग्राहकांना घरपोच सेवा दिली आहे. संस्थेच्या ठे्वींची सातत्याने झालेली वाढ , केलेली कर्जवसुली , ग्राहकांना उत्तम सेवा आदर्श रेषोचे प्रमाण यामुळे हा पुरस्कार संस्थेला प्राप्त झाला आहे.
संस्थेकडे वीज बिल भरणा केंद्र, लॉकर सुविधा , SMS सुविधा, NEFT, RTGS IMPS. सुविधा ,खातेदारांना तात्काळ पैसे पाठविण्यासाठी IMPS सुविधा सुरू केली आहे. या सर्व सुविधांचा लाभ घ्यावा असे संस्थेचे चेअरमन राजेश लांजेकर , व्हा.चेअरमन विष्णू शिंदे यांनी आव्हान केले आहे.
सदरच्या पुरस्कारात संस्थेचे सर्व सभासद ,कर्जदार, ठेवीदार व हितचिंतक यांचा हि मोलाचा वाटा आहे.सदरचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व संचालक कर्मचारी वर्ग व पिग्मीएजंट यांचे लांजा शहरातून कौतुक केले जात आहे.











