सुकीवली नजीक तिहेरी अपघात

खेड(प्रतिनिधी)
तालुक्यातील सुकिवली -कुडोशी दरम्यान खेड-नांदिवली बससह बोलेरो पिकअप व्हॅन व स्वीफ्ट कार यांच्यात  तिहेरी विचित्र अपघात झाला. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसली तरी स्वीफ्ट कारच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर काहीकाळ वाहतूकही खोळंबली.
येथील बसस्थानकातून दुपारी ३ वाजता सुटणारी खेड-नांदिवली बस (एम.एच.०२०/बी.एल. १४३६) नांदिवलीच्या दिशेने जात होती. याचदरम्यान, भरणेच्या दिशेने येणारी कार (एम.एच.०५/व्ही.एम. १४१४) व बोलेरो पिकअप व्हॅन या तीन वाहनांमध्ये अपघात घडला. अपघातात तीनही वाहनातील प्रवाशांना दुखापती झाल्या नसल्या तरी वाहनांचे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले.