दापोलीत आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने महिला दिनानिमित्त प्रशिक्षणाचा आयोजन 

दापोली l प्रतिनिधी:-दापोली येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आणि यशस्वी कॉम्प्युटर अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त 8 ते 15 मार्च या कालावधीत महिलांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

हे प्रशिक्षण सकाळी 11:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील यशवी कॉम्प्युटर अकॅडमी येथे देण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी 7498503348 या क्रमांकावर संपर्क साधण्याचा आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.