गावखडी / वार्ताहर :रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापिका सौ. शर्वरी करगुटकर, उपशिक्षक श्री.चंद्रशेखर पेटकर, शिक्षिका सौ. श्रेया रसाळ , अंगणवाडी शिक्षिका सौ. सुनिता मेस्त्री, मदतनीस श्रीम. आकांक्षा गुरव, चित्रा हातणकर , सलोनी खरडे , आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली होती.
या कार्यक्रमात उपशिक्षक श्री.चंद्रशेखर पेटकर यांनी दरवर्षी 8 मार्च हा दिवस महिलांच्या संघर्षांचा , त्यागाचा , आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो .आज महिला शिक्षण , विज्ञान, क्रिडा , व्यवसाय अशा विविध क्षेत्रात यशस्वीपणे आपली छाप उमटवत आहेत. असे प्रतिपादन केले.
जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा मेर्वी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शर्वरी करगुटकर , अंगणवाडी च्या शिक्षिका सौ. सुनिता मेस्त्री, मदतनीस श्रीम. आकांक्षा गुरव, चित्रा हातणकर , माजी विद्यार्थीनी सलोनी खरडे आदींचा मेर्वी शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.आणि जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
शेवटी मुख्याध्यापिका सौ.शर्वरी करगुटकर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.












