लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील आदर्श विद्यामंदिर माजी विध्यार्थी संघटना प्रभानवल्ली-खोरनिनको आयोजित अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेत हरळ येथील ओंकार इलेव्हन संघाने विजेतेपद पटकावले.
ही स्पर्धा नुकतीच पार पडली. स्पर्धेमध्ये एकूण १६ संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उदघाटन प्रमुख कोर्ले गावचे सरपंच व उद्योजक गणेश साळुंके यांनी केले.त्याप्रसंगी श्री देवी आदीष्टी शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस विठोबा चव्हाण ,माजी अध्यक्ष विजयकुमार चौघुले, कार्याध्यक्ष जितेंद्र ब्रीद ,संचालक गणेश चव्हाण त्याचबरोबर इतर पदाधिकारी उपस्थित होते. तसेच प्रभानवल्ली गावचे तंटामुक्ती अध्यक्ष मंगेश जाधव ,कोर्लेराजा गणेश मंडळाचे अध्यक्ष श्री.साळुंके त्याबरोबर भूदाते श्री.गुरव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे माजी अध्यक्ष विनायक बिजम व प्रास्ताविक संघटनेचे सरचिटणीस आतिष माणगेकर यांनी सादर केले. स्पर्धेत प्रथम क्रमांक चा मानकरी ठरला ओंकार इलेव्हन हरळ तर उपविजेता ठरला जयभवानी इलेव्हन संघ प्रभानवल्ली. तर मालिकावीर म्हणून ओंकार थरली तसेच उत्कृष्ट फलंदाज- रोहित शिंदे, उत्कृष्ट गोलंदाज-राकेश शिंदे व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक -युवराज यांना गौरविण्यात आले.
स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमाला
प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमहापौर नवी मुंबई व अध्यक्ष- रत्नागिरी जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस अविनाश लाड उपस्थित होते. तसेच राजापूर नागरिक संघ मुबई-ग्रामीण चे अध्यक्ष सुभाष लाड ,काँग्रेस लांजा तालुका अध्यक्ष बब्या हेगिस्टे ,संस्थेचे कार्याध्यक्ष जितेंद्र ब्रीद,संचालक- अनंत शिंदे, गणेश चव्हाण ,खोरनिनको तंटामुक्ती अध्यक्ष-भगवान पांचाळ तसेच कल्पना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संस्थापक मंगेश चव्हाण, बाबू शिंदे, माजी सैनिक अनंत चव्हाण, उपस्थित होते.
स्पर्धा पार पाडण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष संतोष गुरव,उपाध्यक्ष- प्रसाद गिरकर सरचिटणीस-आतिष माणगेकर, खजिनदार-बिलाल हकीम,कार्याध्यक्ष-संदेश सोमेस्कर, माजी अध्यक्ष -विनायक बीजम, उपसचिव-रुपेश शिंदे ,उप खजिनदार-सचिन वनावडेकर ,शाळा संपर्क प्रमुख-प्रथमेश कालेकर व सदस्य – रविंद्र भातडे , अमोल पालांडे,समीर जाधव,शुभम शिंदे यांनी अथक परिश्रम घेतले त्याबरोबर माजी विध्यार्थी शैलेश चव्हाण,भरत शिंदे, भरत गुरव, मयुर गुरव,सलमान फकीर,सिराज फकीर, विवेक पालांडे ,मंगेश चव्हाण व शाळेचे दोन्ही शिपाई महेश गुरव व दत्तप्रसाद चव्हाण तसेच मार्गदर्शक जितेंद्र ब्रीद व गणेश चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले.












