शिरगाव (प्रतिनिधी) देवगड तालुक्यातील शिरगाव येथील राजे ग्रुप या सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज, ९ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता शिरगाव हायस्कूलच्या रंगमंचावर मोफत ‘छावा’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित हा चित्रपट नव्या पिढीला इतिहासाची प्रेरणा देणारा आहे. त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी आणि इतिहासप्रेमींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजे ग्रुपचे हेमंत देसाई, संदीप साटम, मिलिंद साटम यांनी केले आहे.











