कुडाळ l प्रतिनिधी :बाल दशावतार नाट्य स्पर्धेचे आयोजन हे खरंच कौतुकास्पद आहे असं गौरवोद्गार प्रा. वैभव खानोलकर यांनी काढले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चेंदवण पडोशी या ठिकाणी नुकताच प्राथमिक शाळेचा जि.प.शाळा चेंदवण पडोशी अमृत महोत्सव वर्षपूर्ती सोहळ्या निमित्त बाल दशावतारी नाट्य स्पर्धेचे मोठ्या थाटात उद्घाटन संपन्न झाले.
दशावतार कला समृद्ध व्हावी आणि भावी
कलावंत या लोककलेला मिळावे म्हणून चेंदवन ग्रामस्थ आणि प्राथमिक शाळेच्या आजी-माजी विद्यार्थी व अमृत महोत्सव संयोजन समिती वतीने विद्यार्थी कलावंतांसाठी रंगमंच उपलब्ध करून देत या शाळेच्या भव्य रंगमंचावर बाल दशावतारी नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले
या उद्घाटन सोहळ्यात झी मराठीवर आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत अनेकांची वाहवा मिळवणाऱ्या छोटा पॅक बडा धमाका फेम बालकलाकार आरव आईर यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर विशेष सत्कारात दशावताराचे अभ्यासक, निवेदक व उपक्रमशील अध्यापक प्रा.वैभव खानोलकर यांचा चेंदवण गावाचे प्रथम नागरिक तथा सरपंच श्री वैभव चेंदवणकर हस्ते सत्कार संपन्न झाला वैभव खानोलकर यांनी नुकतेच एक समृद्ध लोककला दशावतार हे पुस्तक प्रकाशित केले असून या पुस्तकामुळे दशावतारातील वैविध्यपूर्ण माहिती जगासमोर आली आहे दशावतार लोककलेला एक वेगळी उंची मिळून देण्यासाठी आणि शासन दरबारी कलावंताची व्यथा मांडण्याचा प्रयत्न सातत्याने खानोलकर करत असतात म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल केलेल्या सत्काराला उत्तर देताना वैभव खानोलकर यांनी बाल दशावतार स्पर्धेच्या माध्यमातून बाल कलावंतांना रंगमंच उपलब्ध करून देणाऱ्या चेंदवण गावाच्या सर्व नागरिकांचे व अमृत महोत्सवी संयोजन समिती तसेच मुख्याध्यापक सचिन मदने आणि सहाय्यक शिक्षक भालचंद्र आजगावकर यांचे ऋण व्यक्त केले आजचे हे बालकलाकार उद्याचे उदयमुख दशावतारी कलावंत होणार आहेत आणि अशा विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या उपजत गुणांना जागा करण्याचं काम करणाऱ्या शिक्षकांमध्ये मदने सर आणि आजगावकर सर बरोबर आज भव्य बालदशावतारी स्पर्धांचे आयोजन करणारे चेंदवन गावातील सर्व नागरिक त्याचबरोबर अमृत महोत्सव संयोजन समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे योगदान कदापि विसरत येणार नाही असे मत व्यक्त केले
बाल दशावतारी नाट्य स्पर्धा ही दशावतार लोककलेसाठी निश्चित नवसंजीवनी ठरू शकते आणि याच रंगमंचावरून उद्याचे दर्जेदार लोककलावंत घडू शकतात असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भव्य जिल्हा स्तरीय बालदशावतार नाट्य स्पर्धेचे उद्घाटन समारंभा सोहळ्यात व्यासपीठावर चेंदवण सरपंच श्री वैभव चेंदवणकर व श्री कमलाकर शृंगारे , श्री देवी माऊली पाताळेश्वर वगैरे देवस्थान उपसमिती चेंदवण अध्यक्ष श्री संजय परब,प्रमोद शृंगारे,देवेंद्र नाईक ,शशिकांत चव्हाण ,दिनेश आजगावकर,परिक्षक पपू नांदोसकर,भास्कर सामंत,विजय शृंगारे,नरेश मयेकर,पोलिसपाटील रामचंद्र पेडणेकर,सौ शुभश्री शृगारे,ग्रा.प.सदस्य सौ प्रणाली तेंडोलकर,सौ सुचिता पोयरेकर,प्रा.वैभव खानोलकर,धोंडू रेडकर,राजन कोरगावकर,प्रकाश तांबे,मुख्याध्यापक सचिन मदने ,उपशिक्षक भालचंद्र आजगावकर आदी उपस्थित होते.
या बाल दशावतारी नाट्य स्पर्धेला नाट्य रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.











