रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 19 वा वर्धापन दिन संपूर्ण राज्यात संपूर्ण जोशात साजरा केला जातो तसाच तो रत्नागिरी मध्ये देखील उद्या रविवार दि. ९ मार्च रोजी धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी येथील राज ठाकरेंची माणसे सज्ज झाली आहेत.
उद्या सकाळी 9 वाजता सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. त्या नंतर सकाळी 11 वाजता नूतन जिल्हा संपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात येणार आहे. हे कार्यालय सर्वसामान्य लोकांकरिता कामं करण्यासाठी असणार आहे. सकाळी 11.30 वाजता रत्नागिरी शहरात काम करून कुटुंब चालवाणाऱ्यां कष्टकरी महिलांचा सत्कार करण्या येणार आहे. ज्या मध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय मधील मावशी,रत्नागिरी नगरपालिका स्वच्छता कर्मचारी महिला, भंगार गोळा करून कुटुंब चालवणाऱ्या महिला व भाजी विकून आपला चारितार्थ चालवणाऱ्या अशा कष्टाकरी महिलांना साडी चोळी व संसारोपोयोगी साहित्य देऊन सन्मानित केले जाणार आहे.
असे उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर यांनी कळविले आहे.











