पहिल्याच दिवशी होळी स्पेशल धावल्या निर्धारित वेळेत

खेड (प्रतिनिधी)
कोकण मार्गावर शिमगोत्सवासाठी पहिल्या दिवशी  धावलेल्या चारही होळी स्पेशल निर्धारित वेळेत मार्गस्थ झाल्याने चाकरमान्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
२ तास उशिराने धावलेल्या उधना-मंगळूर स्पेशलचा अपवाद वगळता सर्वच नियमित गाड्यांसह होळी स्पेशल नियोजित वेळेत रवाना झाल्या. सणांच्या कालावधीत कोकण मार्गावरील एकेरी मार्गावर धावणाऱ्या स्पेशलच्या वाढत्या फेऱ्यांमुळे चाकरमान्यांना विलंबाच्या प्रवासाला सामोरे जावे लागते. शिमगोत्सवातील पहिल्याच दिवशी रेल्वेगाड्या नियमित गाड्यांसह होळी स्पेशल निर्धारित वेळेतच त्या त्या स्थानकातून रवाना झाल्याने चाकरमान्यांना हायसे वाटले.