कर्जबाजारी महिलेचा मानसिक छळ केल्याप्रकरणी एका खासगी सावकाराला अटक….

प्रतिनिधी/ रोहन कांबळे 

 

कोल्हापूर: कर्जाच्या वसुलीच्या नावाखाली महिलेचा शारीरिक व मानसिक छळ करून विनयभंग केल्याच्या धक्कादायक प्रकरणात खासगी सावकाराला गांधीनगर पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांशी पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील संशयित अमित कृष्णात सावंत (वय ३५, रा. गडमुडशिंगी ता.करवीर) याच्या विरोधात गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडीत महिला एक सामाजिक संस्थेत कार्यरत असून तिने २०२३ साली आर्थिक अडचणीमुळे आरोपीकडून २ लाख रुपये घेतले होते.सुरुवातीला व्याजाची परतफेड नियमित केली जात होती. मात्र नंतर आर्थिक अडचण वाढल्याने परिस्थितीचा पहिला फायदा घेत आरोपीने महिलेवर शरीरसुखाची मागणी केल्याचे समोर आले आहे.

महिला एकटी असताना तिच्यावर जबरदस्ती अत्याचार करून त्याचे चित्रीकरण केल्याचा आरोप खासगी सवकरावर आहे.त्यानंतर संबंधित व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने वारंवार महिलेचा छळ केला.धक्कादायक बाब म्हणजे पिडीतीने व्याजासह २ लाख दहा हजार रुपये परत केले असतानाही उर्वरित रकमेच्या कारणावरून महिलेचा मानसिक, शारीरिक छळ सुरू होता.

दरम्यान या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर जावयाने जाब विचारल्यानंतर जावयावर आरोपीने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. बदनामीच्या भीतीने काही काळ गप्प राहिलेल्या महिलेने अखेर धैर्य दाखवत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

गांधीनगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी करत आहेत.