खेड (प्रतिनिधी)
रयत शिक्षण संस्था संचलित तालुक्यातील धामणी येथील आर.जी.काते विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी येथील सिटी प्राईड सेंटरमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट पाहिला. माजी विद्यार्थी सेवा संस्थेच्या बतीने अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती संभाजी महाराजांनी केलेले कार्य नव्या पिढीला कळावे, हा हेतू डोळ्यासमोर ठेवत माजी विद्यार्थी सेवा संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना छावा चित्रपट दाखवण्यात आला. यासाठी ग्रामीणचे अध्यक्ष विनोद गोगावले यांचे सहकार्य लाभले











