चोरी प्रकरणी एकास अटक

प्रतिनिधी /रोहन कांबळे :कोल्हापूर : फेसबुकवर ओळख झालेल्या मैञीणीशी जवळीक साधून मोबाईल, सोन्याचे दागिने आणि ५० हजाराची रोकड लंपास केल्या प्रकरणी योगेश वसंत पाटील ( वय ४५, रा.भवानी मंडप, कोल्हापूर) याचेवर लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या चोरी प्रकरणाने खळबळ उडाली आहे.

पीडित महिला ही उच्च शिक्षित आणि गर्भश्रीमंत घराण्यातील आहे. योगेश पाटील याची फेसबुकवर ओळख झाली. त्यातून दोघांच्या भेटी-गाठी होत असल्याने जवळीक वाढली. योगेश याने विश्वास संपादन करुन पीडित महिलेला लक्ष्मीपूरी येथील रिलायन्स माॅल शेजारील टॅम्पो लाईन परिसरात कारमधून घेऊन आला. सोबत पीडित महिलेची भाची होती. या ठिकाणी नारळपाणी मालकाला पैसे दिले नंतर पीडित महिलेच्या भाची कडून पीडितेचा मोबाईल घेत सोन्याची चेन आणि गाडीत ठेवलेली पन्नास हजार रोकड घेऊन पसार झाला. पीडित महिलेने त्याचे विरोधात पोलीसात तक्रार दिली.

योगेश पाटील याचेवर यापूर्वी ही अनेक गुन्हे दाखल असलेची चर्चा आहे. चायनिज गाडी ते बाॅडी बिल्डर म्हणून त्याची ओळख आहे. फेसबुकवर महिलेशी ओळख करुन तिच्याच वस्तू चोरी केल्या प्रकरणी महिला वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. चोरीच्या गुन्ह्य़ाचा अधिक तपास लक्ष्मीपूरी पोलीस करीत आहेत.