कुडाळ शहर भाजपच्या वतीने आयोजन
कुडाळ :कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप शहर यांच्या वतीने शहरातील कन्याशाळा तसेच तालुका स्कूल येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी भाजपा जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष रेखा काणेकर कुडाळ नगरपंचायत उपनगराध्यक्ष किरण शिंदे बांधकाम सभापती उदय मांजरेकर माझी नगराध्यक्ष अक्षता खटावकर नगरसेविका सईकाळप श्रेया गवंडे ज्योती जळवी निलेश परब माझी नगरसेवक सुनील बांदेकर साईश घुर्ये आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सुरेल आवाजात गायन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भाजपच्या वतीने घेण्यात आलेल्या उपक्रमाबाबत विद्यार्थी शिक्षक यांच्या मधून आनंद व्यक्त करण्यात आला.












