भडगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योत शिष्यवृत्ती प्राप्त

स्वप्निल कदम l कुडाळ :ग्लोबल फाउंडेशन, पिंगुळी या संस्थेच्या वतीने कडावल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सह्याद्री माध्यमिक विद्यालय भडगाव बुद्रुक प्रशालेच्या पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन हजार सहाशे रुपये ज्ञानज्योत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यामध्ये विद्यालयाच्या कुमारी दीप्ती नामदेव लोट , कुमार भार्गव जनार्दन गुरव, कुमारी अर्पिता आनंद कोळपटे, कुमारी पौर्णिमा संभाजी तेली , कुमार तन्मय महेश राणे ह्यांनी ही शिष्यवृत्ती प्राप्त केली. या शिष्यवृत्तीबद्दल संस्थाध्यक्ष चंद्रशेखर सावंत, सचिव संभाजी वळंजू , मुख्याध्यापक सचिन धुरी, सर्व संचालक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व ग्लोबल फाउंडेशन संस्थेचे आभार मानले.