आंबोली बस स्थानक पर्यटन दृष्टीने विकसित करण्याची मागणी मान्य

आंबोली सरपंच सावित्री पालेकर यांनी मानले आ.केसरकर व परिवहन मंत्र्यांचे आभार 

आंबोली । प्रतिनिधी : 

आंबोली बस स्थानक पर्यटन दृष्टीने विकसित करण्याची आंबोली सरपंच सौ. सावित्री पालेकर यांनी आमदार दीपक केसरकर यांच्याकडे केलेली मागणी केसरकर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून मार्गी लावली आहे. याबाबत आंबोली सरपंच सौ. सावित्री पालेकर यांनी आ. केसरकर व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार मानले.

आंबोली पर्यटन दृष्टीने विकसित होत असताना येथील बस स्थानकही पर्यटन दृष्टीने सुंदर व सर्व सोई सुविधानी परिपूर्ण असावे व त्यामुळे आंबोलीतील पर्यटन व्यवसायात भर पडेल या साठी आंबोली सरपंच सौ. सावित्री पालेकर यांनी पुणे येथे आंबोली गेळे ग्रामस्थ संघटनेच्या वार्षिक स्नेह संमेलनच्या कार्यक्रमा दौऱ्यात आमदार दीपक केसरकर यांच्याकडे मागणी केली होती.

आंबोलीत पर्यटन दृष्टीने विकास व्हावाया साठी बरेच प्रकल्प व विकास कामे सुरु आहेत. महायुती सरकारच्या माध्यमातून आंबोलीमध्ये लवकरच येथील बस स्थानकही सुसज्य होईल व येथील पर्यटनवाढीला त्याचा नक्कीच फायदा होईल, असे सावित्री पालेकर यांनी म्हटले आहे.