गायन अनंत आरोलकर, अभिनयात अथर्व ठुंबरे तर लंगार नृत्यमध्ये वीर गावडे व नारायण गावडे प्रथम
वेंगुर्ले | प्रतिनिधी : वेंगुर्ले येथे दशावतार बाजातील गायन, अभिनय व लंगारनृत्य स्पर्धेला जिल्ह्यातील स्पर्धकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गायन मध्ये अनंत आरोलकर, अभिनयात अथर्व ठुंबरे तर लंगार नृत्य मध्ये वीर गावडे व नारायण गावडे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे दुसऱ्या अखिल भारतीय दशावतार नाट्य संमेलनानिमित्त अखिल दशावतार नाट्य संस्था व वेताळ प्रतिष्ठान सिधुदुर्गतर्फे ही स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेमध्ये दशावतार बाजातील गायन स्पर्धा – प्रथम-अनंत आरोलकर, द्वितीय-रूद्र स्वार, तृतीय-गजानन नाईक, उत्तेजनार्थ-न्हानू गावडे, अंकुश आजगांवकर यांनी पटकाविला. याचे परीक्षण ज्येष्ठ भजनीबुवा भालचंद्र केळुसकर व दशावतारातील बालगंधर्व ओमप्रकाश चव्हाण यांनी केले.
दशावतार अभिनय स्पर्धा-प्रथम अथर्व ठुंबरे, द्वितीय-वीर गावडे, तृतीय-पार्थ सावंत, उत्तेजनार्थ-सदाशिव गावडे, यश सावंत, गायत्री कावले यांनी पटकाविला. याचे परिक्षण पपू नांदोसकर व महेश गवंडे यांनी केले. तर लंगार नृत्य स्पर्धा मध्ये प्रथम-वीर गावडे व नारायण गावडे, द्वितीय-अथर्व सावंत व ओंकार दाभोलकर, तृतीय-रूद्र म्हापणकर व प्रविण तेली, उत्तेजनार्थ-सदाशिव गावडे व अथर्व ठुंबरे, द्वितीय-दिशम परब व गंश परब यांनी पटकाविला. याचे परिक्षण जि. प. समाजकल्याणचे माजी सभापती अंकुश जाधव व ज्येष्ठ दशावतारी संतोष रेडकर यांनी केले. स्पर्धकांना मयुर गवळी, हरेश नेमळेकर व मंदार सावंत यांनी संगीतसाथ केली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले












