जागतिक वन व हवामान दिन निमित्त पटवर्धन शहर वाचनालय येथे व्याख्याने 

रत्नागिरी :रत्नागिरी आणि परिसरातील निसर्गप्रेमी मंडळी आणि महाराष्ट्रातील निसर्गतज्ञ यांनी एकत्रित येवुन स्काय अॅण्ड अर्थ निसर्ग चळवळ सुरु केलेली आहे. त्यामार्फत तज्ञांची दृकश्राव्य व्याख्याने, तज्ञांसह निसर्गसहली असे कार्यक्रम गेली चार वर्षे आयोजित केले जात आहेत. रविवार दि. २३ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता स्काय अॅण्ड अर्थ आणि श्रीम. विमलाताई पटवर्धन शहर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वन दिन तसेच जागतिक हवामान दिन निमित्ताने प्राध्यापक. श्री. शरद आपटे [गोगटे जोगळेकर महाविदयालय वनस्पतीशास्त्र विभाग] आणि श्री. मिलींद पाटील [वन पुनर्संचयन आणि वनपरिसंस्था पुनरुज्जिवन चळवळीचे प्रणेते सिंधुदुर्ग] या दोन तज्ञ व्यक्तींचे दृकश्राव्य व्याख्यान मारुती मंदिर येथील श्रीम. विमलाताई पटवर्धन शहर वाचनालय, छ. शिवाजी महाराज स्टेडिअमच्या मागिल बाजुस, स्वामी विवेकानंद पथ, रत्नागिरी येथे आयोजित केले आहे तरी सर्व निसर्गप्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थितीत राहुन कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे