छत्रपती शिवाजीनगर येथे सकल हिंदू समाजातर्फे २६ एप्रिलला विराट हिंदू संमेलनाचे आयोजन

रत्नागिरी : शहराजवळील छत्रपती शिवाजीनगर परिसरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी दि. २६ एप्रिल रोजी सायंकाळी ५. ०० ते ७. ०० या वेळेत नगरपरिषद वसाहत येथील श्री जय हनुमान मंदिरातील जागेत हे संमेलन पार पडणार आहे.

या संमेलनात हिंदुत्व, हिंदू समाजासमोरील सध्याची आव्हाने तसेच पंचपरिवर्तन या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. छत्रपती शिवाजीनगर, नगरपरिषद वसाहत, स्टेट बँक कॉलनी, कोकण नगर,क्रांतीनगर, कीर्ती नगर, पहिली कदमवाडी, राधाकृष्ण नगर,स्वरूपानंद नगर,प्रशांत नगर,भक्ती कुंज, साई भूमिनगर,एमआयडीसी भाग, सिद्धिविनायक नगर, साळवी स्टॉप या परिसरातील हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

हिंदू समाजामध्ये ऐक्य रहावे,हिंदू समाजाने एकत्र यावे व राष्ट्रा करिता त्यांच्या मनात राष्ट्रप्रेम जागृत व्हावे या उद्देशाने या हिंदू संमेलनाचे आयोजन केले आहे.
हिंदूंनी मोठ्या संख्येने कुटुंबासह उपस्थित राहून संमेलन यशस्वी करावे. संमेलनास उपस्थित राहणाऱ्या सर्वांनी शक्यतो मंगल वेशात यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.