रत्नागिरी ः प्रतिनिधी
किरकोळ कारणातून पतीच्या पहिलया पत्नीच्या दोन मुलांनी महिलेला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने आणि हातांनी मारहाण केली. ही घटना मंगळवार 18 मार्च रोजी सायंकाळी 7 वा.सुमारास कोकणनगर येथे घडली.
जुबेर मोहम्मद मजगावकर (36, रा.किर्तीनगर,रत्नागिरी), झहीर मोहम्मद मजगावकर (47, रा.मिरकरवाडा,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयित मुलांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात पिडीत महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी सायंकाळी पिडीता आपल्या पतीला जेवणाचा डबा घेउन कोकणनगर येथे गेली होती. तेव्हा पिडीतेच्या पतीच्या पहिल्या पत्न्ाीची दोन मुले तिथे हजर होती.
त्यांनी पिडीतेला पाहिल्यानंतर संगनमताने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तू, जेवणाचा डबा घेउन यायचे नाही असे बोलले. तेव्हा पिडीतेने त्यांना तुमचा काहीही संबंध नाही,मी त्यांची पत्न्ाी आहे असे सांगितले. याचा राग आल्याने दोन्ही संशयितांनी पिडीतेला लाकडी दांडक्याने आणि हातांच्या थापटांनी मारहाण केली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.











