गोहत्या प्रकरणी मकोका कायद्याअंतर्गत कारवाई होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा ; आमदार निलेश राणे यांनी उपस्थित केला होता प्रश्न

मालवण | प्रतिनिधी : अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोहत्या बंदीसाठी योग्य त्या कायद्याची तरतूद करावी. धोरणात्मक निर्णय घ्यावा. तसेच कत्तलखाने उध्वस्त करून गोवंश तस्करी व गोहत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. ही प्रमुख मागणी कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी केली होती. त्या अनुषंगाने बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली. राज्यामध्ये वारंवार होणाऱ्या गोहत्या रोखण्यासाठी अश्या आरोपींवर संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल. असे स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रात गोवंश हत्या आणि गायींच्या तस्करी मोठ्या प्रमाणात राजरोस पणे होत आहेत. गोवंश हत्या करण्यावर शासनाने कडक कारवाई केली पाहिजे. कायद्यातील तरतूद वाढवली पाहिजे. हा गुन्हा अजामीनपात्र केला पाहिजे. कारण यां गुन्हात काहीजण वारंवार सहभागी असल्याचे दिसून आले आहे. तस्करीवर यांची घरे चालतात. कोकण पासून कराड पर्यंत तसेच महाराष्ट्रात पाळेमुळे आहेत. यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी विधानसभेत आमदार निलेश राणे यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गोवंश हत्या संदर्भात वारंवार असे गुन्हे दाखल होत आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे.