गॅस टँकरमधील गॅस चोरणाऱ्या संशयिताच्या गुजरातमधून आवळल्या मुसक्या

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी 

रत्नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील करबुडे येथे चार वर्षांपूर्वी गॅस टँकरमधील गॅस चोरणाऱ्या संशयिताच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुजरातमधून मुसक्या आवळल्या.
बुधराम रामलाल (42) असे पकडण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याने 2022 मध्ये करबुडे येथील गॅस टँकरमधील गॅसची चोरी केली होती. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तपास करत होती. त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हे पथक गुजरातला रवाना झाले होते. तेथून गोपनीय आणि तांत्रिक माहितीच्या आधारे संशयिताच्या मुसक्या आवळण्यात आल्या. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस फौजदार बाळू जाधव,पोलिस हेड काँस्टेबल विनायक राजवैद्य,बाळू पालकर आणि रमिज शेख यांनी केली.