एकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहर पोलिसांनी गुरुवारी सकाळी 8.15 वा.सुमारास मिरजोळे-नाखरेकरवाडी येथील गावठी हातभट्टीवर धाड टाकत तब्बल 1 लाख 7 हजार रुपयांच्या गुळ-नवसागर मिश्रीत कुजके रसायन ताब्यात घेत कारवाई केली.
सुनिल सदाशिव जाधव (54,रा.मिरजोळे बौध्दवाडी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल शरद कांबळे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी सकाळी शहर पोलिसांनी मिरजोळे-नाखरेकरवाडी येथील झाडी-झूडूपाच्या भागात या हातभट्टीवर धाड टाकली. त्यांनी 220 लिटर गुळ-नवसागर मिश्रीत कुजके रसायन,35 लिटर गावठी दारु,ॲल्युमिनियमची डेग,पत्र्याचे बॅरल असा एकूण 1 लाख 7 हजारांचा मुद्देमाल जप्त्ा केला. संशयिताविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 ब,क,ड,फ,ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











