दापोलीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे सोपवला अतिरिक्त कार्यभार
खेड(प्रतिनिधी) खेड पंचायत समितीचा कारभार अजूनही प्रभारींच्या हातात आहे. गटविकास अधिकारी यशवंत भांड यांची बदली झाल्यानंतर अजूनही येथील पंचायत समितीला कायमस्वरुपी गटविकास अधिकारी मिळालेले नाहीत. दापोलीचे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांच्याकडे येथील पंचायत समितीचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. दोन्ही पंचायत समितीचा कार्यभार हाकताना त्यांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे.
येथील पंचायत समितीत प्रभारींचा प्रकार पुन्हा एकदा सुरू झाला आहे. कायम स्वरूपी गटविकास अधिकारी म्हणून यशवंत भांड यांची नियुक्ती झाल्यानंतर प्रशासकीय कारभारासह विकासकामांनाही गती मिळाली होती. मात्र भांड यांची बदली झाल्यानंतर अतिरिक्त कार्यभाराची सूत्रे दापोलीचे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. येथील पंचायत समितीत ते मोजकेच दिवस उपस्थित रहात असल्याने
येथील पंचायत समितीमध्ये गेल्या ६ महिन्यांपासून कायमस्वरुपी गटविकास अधिकारी नाहीत. जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागातही प्रभारी अधिकारी कार्यरत आहेत. ग्रामपंचायत कार्यालयांमध्येही पूर्ण वेळ ग्रामसेवक नसल्याने विकासकामे रखडली आहेत. अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी कार्यालयीन कामकाजाचा पुरता बोजवाराच उडाला आहे. त्या-त्या कार्यालयातील रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी आग्रही मागणी केली आहे. आहे. यामुळे पंचायत समितीला कायमस्वरुपी गटविकास अधिकारी मिळणार कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रिक्त पदे भरण्यासाठी उपोषण
तालुक्यात अनेक वर्षांपासून सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने विकासकामे पूर्ण होण्यास अडसर निर्माण होत आहे. यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे न भरल्यास १ मे रोजी भरणे येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर उपोषण छेडण्याचा इशारा महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे यांनी दिला आहे.
प्रशासकीय कामकाजात अडचणी उद्भवत आहेत. प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांनाही दापोली व खेड पंचायत समितीचा कारभार हाकताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रभारी गटविकास अधिकारी कार्यालयात मोजकेच दिवस उपस्थिती लाभत असल्याने खात्यांतर्गत अधिकाऱ्यांनाही प्रशासकीय कामकाजात समस्यांचा निपटारा करताना दमछाक होत आहे









