खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील बहिरवली- देऊळवाडी येथील हनुमान सेवा मंडळाच्या वतीने ३० मार्च रोजी हनुमान मंदिर स्थापनेचा शताब्दी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध धार्मिक तसेच क्रिकेट स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले आहे.
याप्रसंगी मुंबई मंडळाचे अध्यक्ष दशरथ बांद्रे, सचिव संतोष भागणे, खजिनदार सोनू घडशी, महिला मंडळाच्या अध्यक्षा दीपाली बांद्रे, सेक्रेटरी स्वाती भागणे, खजिनदार स्वरा भागणे, ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष रमेश भागणे, सचिन बांद्रे, विनय शिगवण, रजनी भांगणे, वासंती बांद्रे, विद्या भागणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.











