उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे आश्वासन
खेड (प्रतिनिधी) राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतीपंप हा सौरऊर्जेद्वारे देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मात्र कोकणात सौर ऊर्जा उपयोगात येत नाही , हे ध्यानी घेऊन कोकणातील शेतकऱ्यांसाठी पूर्वीप्रमाणेच शेतीपंप विद्युत जोडणी द्वारेच देण्यात येतील, यासाठी आपण खास बाब म्हणून प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी खेड राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे रत्नागिरी येथे आले असताना खेड राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संजय जाधव, दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष स. तु. कदम , जिल्हा उपाध्यक्ष जलालभाई राजपूरकर , मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष महेश मोहिते व अन्य कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने रत्नागिरी विश्रामधामात अजितदादा पवारांची भेट घेऊन सौर ऊर्जेव्दारे शेतीपंप कोकणातील शेतकऱ्यांना कशाप्रकारे त्रासदायक ठरू शकतो, याचे सविस्तर विवेचन करून कोकणातील शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणेच विद्युत जोडणीद्वारेच शेतीपंप देण्यात यावेत,अशी मागणी केली. त्यांच्या मागणीचा विचार करून कोकणातील शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणेच विद्युत जोडणीद्वारेच शेतीपंप देण्यात येतील , असे आश्वासन अजितदादा पवार यांनी दिले









