आमदार निलेश राणे यांची कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे मागणी ; सकारात्मक निर्णय घेण्याची मंत्री फुंडकर यांची ग्वाही
अमित खोत | मालवण : आमदार निलेश राणे यांनी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची त्यांच्या
विधानभवन दालनात भेट
घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वतंत्र कामगार आयुक्त मिळावे ही प्रमुख मागणी मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे केली. तसेच कामगारांच्या समस्येबाबतही चर्चा केली.
दरम्यान, कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सकारात्मक निर्णय देऊ असे आश्वासन यावेळी आमदार निलेश राणे यांना दिले.
अर्थसंकल्पीय अधिवेशन दरम्यान आमदार निलेश राणे यांनी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वतंत्र कामगार आयुक्त मिळावे ही प्रमुख मागणी तसेच कामगारांच्या समस्येबाबतही सकारात्मक चर्चा झाली.












