निलेश राणे यांच्या नेतृत्वात कुडाळ मालवण गतिमान विकासाचा आदर्श ठरेलं
माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी व्यक्त केला ठाम विश्वास
वैभव नाईक यांच्या अपयशी कारभारामुळे दहा वर्षे विकास ठप्प
मालवण | प्रतिनिधी : मालवण कुडाळ मतदारसंघात दहा वर्षे विकास ठप्प राहिला. शासकीय आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले. यांला सर्वस्वी वैभव नाईक यांचा अपयशी कारभार जबाबदार आहे. स्वतःच्या पक्षाचे मुख्यमंत्री असतानाही यांना विकास करता आला नाही याचा अर्थ त्यांची आणि त्यांच्या पक्षाची विकास करण्याची पात्रताच नाही. त्यामुळे आता जनतेनेच ठरवले आता बदल करायचाच. विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याची क्षमता असलेले कर्तृत्ववान नेतृत्व निलेश राणे यांना सर्वच ठिकाणी घराघरातून पाठिंबा मिळतं आहे. त्यामुळे वैभव नाईक यांचा पराभव निश्चित झाला असून निलेश राणे 50 हजारांच्या मताधिक्याने विजयी होतील. असा ठाम विश्वास मालवण नगरीचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी व्यक्त केला.
मालवण भाजपा कार्यालय येथे सुदेश आचरेकर यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी भाजपा शहरअध्यक्ष बाबा मोंडकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी नगरसेवक जगदीश गांवकर, जॉन नरोना, खरेदी विक्री संघ संचालक आबा हडकर, महिला शहरअध्यक्ष अन्वेषा आचरेकर, भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, नंदू देसाई, किशोर खानोलकर, दादा कोचरेकर यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
सुदेश आचरेकर म्हणाले, वैभव नाईक यांच्याकडे विकासाचे व्हिजन नाही. म्ह्णून दहा वर्षे मालवण कुडाळ विकासात मागे गेला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही निधी आणण्यात हे अपयशी ठरले. त्यांचे मुख्यमंत्री अपयशी ठरले. एकूणच या उबाठाची विकासात्मक कामे करण्याची निधी खेचून आणण्याची पात्रतच नाही. क्षमता नाही. त्यामुळे जनतेने ठरवले त्यांना आता यांना पुन्हा संधी नाही.
मालवण शहराचा विचार करता स्पोर्ट्स कॉम्लेक्स, भाजी मंडई, फायरफायटर हे प्रकल्प रखडले. यांना निधी आणण्याची क्षमता नसल्याने हे सर्व झाले. रॉक गार्डन, मामा वरेरकर नाट्यगृह यांची दुरावस्था झाली आहे. एकूणच विकास ठप्प झाला. त्यामुळे जनतेला यांची क्षमता दिसून आली. म्हणूनच आता जनतेने ठरवले बदल हवा.
विकासाचा दृष्टीकोन ठेवून मतदार निलेश राणे यांच्या पाठीशी उभे राहात आहेत. विकासाचा दृष्टिकोन ठेवून उबाठा मधून मोठया संख्येने प्रवेश महायुतीमध्ये होत आहे. निलेश राणे यांना घराघरातून पाठींबा वाढत आहे. विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी 80 टक्के च्या वर मतदार जनता निलेश राणे यांच्या पाठीशी राहील असे चित्र मालवण शहर तसेच परिसरात प्रचारा दरम्यान सर्वच ठिकाणी दिसून आले. किनारपट्टी भागातूनही निलेश राणे यांना मच्छिमार बांधव पर्यटन व्यावसायिक यांचा पाठिंबा वाढत आहे. ही विजयाची नांदी असून 50 हजरांच्या मताधिक्याने निलेश राणे यांचा विजय निश्चित झाला आहे. असा विश्वास सुदेश आचरेकर यांनी व्यक्त केला.
निलेश राणे यांच्यात जनतेचे प्रश्न सोडवण्याची तळमळ
निलेश राणे हे गेली पाच वर्षे पाच मतदारसंघात जनतेत राहून काम करत आहेत. जनतेचे प्रश्न सोडवण्याची तळमळ आहे. विकास निधी मोठया प्रमाणात आणण्याची धमक त्यांनी दाखवून दिली आहे. खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या साथीने त्यांनी गतिमान विकासाची दिशा दाखवून दिली. त्यामुळे निलेश राणेच आमदार असे चित्र तालुक्यात असून 23 नोव्हेंबरला निवडणुक निकालातून जनतेचा कौल स्पष्ट होईल. असेही सुदेश आचरेकर यांनी सांगितले.
मालवण शहरांत उत्स्फूर्त प्रतिसाद
मालवण शहरातील महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या माध्यमातून गेले काही दिवस सातत्याने प्रचार सुरु आहे. सर्व प्रभागात जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतं आहे. महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घराघरात पोहचली असून माता भगिनी यांचाही पाठिंबा महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनाच आहे. त्यामुळे निलेश राणे यांचा विजय हा मोठया मताधिक्याने निश्चित झाल्याचे सुदेश आचरेकर यांनी सांगितले.












