शिवसेना कार्यकर्ते हेमंत बांदेकर यांना मातृशोक

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरातील शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते हेमंत बांदेकर यांच्या मातोश्री निवृत्त शिक्षिका शैलजा सूर्यकांत बांदेकर (८५, रा. न्यू खासकीलवाडा ) यांचे सोमवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मूलगा, सून, विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.